सुविचार


पैशाचे नाव अर्थ पण तो करतो मोठा अनर्थ (गोंदवलेकर महाराज)
दुर्जनाला वेदांतात बुडवले तरी त्याला सुजनत्व येत नाही.
त्याग हा सर्व प्रकारच्या कलेचा बिंदूच आहे. (महात्मा गांधी)
युध्दाची खरी भयानकता त्यात माणसे मरतात ही नसून माणूस माणसाला मारायला तयार होतो ही आहे.
जगात काही अजरामर नाही तुमच्या चिंतासुध्दा!
जेष्ठत्व केवळ वयामुळे नाही तर गुणांमुळे येते.
लहान मुलांमध्ये आढळणारी चौकसवृत्ती म्हणजे ज्ञानाची भूक होय.
आपले विचार वाळूत लिहा, क्षमेचे वारे त्यांना उडवून लावेल. आपले सुख दगडात कोरा, ते कोणीही खोडू शकणार नाही.
सत्तेपेक्षा सामर्थ्य महत्त्वाचे असते.
माणसाने आपल्या भरवंशावर जगावे.
दीपज्योतीमध्ये असे सामर्थ्य आहे की स्वत: प्रज्वलीत होऊन दुसयाला प्रजलीत करते.
आयुष्यात निश्चित काही मिळवावयाचे असल्यास साहस असावयास पाहिजे.
सानेगुरूजीचे वाड्मय म्हणजे संस्काराचा झरा !
उगीच जिथे रूजत नाही तेथे बी पेरू नये.
जिथे मोल जाणत नाही तिथे शब्द टाकू नये.
संस्कारामुळे माणसाला खरे माणूसपण येते.
ग्रंथहीन घर म्हणजे देहहीन शरीर.
शब्द जपून वापरावेत, शब्दांची धार तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे.
कलीयुग कलीयुग म्हणू नका कलीयुगाला कलायुग बनवा!
मृत्यु नेहमी समीप आहे धरून चालावे त्यामुळे मन वैराग्याकडे वळते.
अंहकार आणि लोभ हे माणसांच्या जीवनातील सर्वात मोठे दु:ख आहे.
चंद्र आणि चंदनापेक्षा सज्जनांचा सहवास शीतल असतो.
काजव्याला वाटते जग आपल्याच लुकलुकण्यामुळे उजळले आहे.
कर्तव्यदक्ष असावे पण कर्मठ नसावे.
उत्साही असावे पण उतावीळ होऊ नये.
कृतज्ञ असावे पण कृतघ्न नसावे.
पवित्र असावे पण पतित होऊ नये.
त्याग करावा पण ताठा नसावा.
स्वाभिमान असावा पण गर्व नसावा.
आत्मविश्वास असावा पण अंहकार नसावा.
स्वतंत्र असावे पण स्वैर नसावे.
घाम गाळल्याशिवाय दामाची खरी किंमत कळत नाही.
माणसाचे प्रेम हे धरती सारखे असते अगोदर एक दाणा पेरावा लागतो.
सुखी होण्यासाठी सुखी होण्याचा मार्ग म्हणजे निसर्गावर, नियतीवर, परमेश्वरावर कोणावर तरी विश्वास ठेवा!
मानवी संबंध धावणाया आगगाडीच्या वेळापत्रकाप्रमाणे नसतात...ते असतात औदुबंराच्या आडव्यातिडव्या पाय वाटासारखे.
श्रध्दा ही सामर्थ्यवान असते. कशावर तरी श्रध्दा ठेवल्याशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही.
ज्याच्या जीवनामध्ये निश्चित ध्येय नसते त्यालाच वेळ घालविण्यासाठी साधन शोधण्याची गरज भासते.

No comments:

Post a Comment