Wednesday, 14 January 2026

🌿 शालेय शैक्षणिक सहल – एक अविस्मरणीय अनुभव!🌿

 


🌿 शालेय शैक्षणिक सहल – एक अविस्मरणीय अनुभव! 🌿


कृष्णा व वेण्णा नद्यांचा माहुली संगम, ऐतिहासिक प्रतापगड, रमणीय वेण्णा लेक आणि जुने महाबळेश्वर या सुंदर ठिकाणांना भेट देत आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबतच निसर्गाचा मनमुराद आनंद घेतला. 🏞️✨


या सहलीदरम्यान मुलांनी प्रत्येक ठिकाणाची माहिती जाणून घेतली, इतिहास अनुभवला आणि प्रत्यक्ष शिकण्याचा आनंद लुटला. अभ्यासाबरोबरच अनुभवातून शिकण्याचा हा प्रवास विद्यार्थ्यांसाठी खरोखरच खास ठरला. 📚🌍


ही सहल यशस्वी करण्यासाठी आमच्या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे मनःपूर्वक आभार 🙏

मुलांची योग्य तयारी करून वेळेवर सहलीसाठी पाठविल्याबद्दल त्यांचे विशेष धन्यवाद.


सहलीदरम्यान सुरक्षित व जबाबदार प्रवासासाठी जाधव दादा यांचे मनापासून आभार 🚍👏


तसेच या उपक्रमासाठी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य करणारे

कुडचे सर, अशोक पाटील सर, डुबुले सर, कापसे मॅडम, निळकंठ मॅडम, आटपाडकर मॅडम,

तसेच चारही शाळांचे मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख पवार साहेब, विस्तार अधिकारी मुलाणी साहेब, गटशिक्षणाधिकारी साबळे साहेब, सर्व सहकारी घटकांचे मनःपूर्वक धन्यवाद. 💐


✨ शिकत-शिकत फिरण्याचा हा अनुभव कायम स्मरणात राहील! ✨



राजू सुखदेव आटपाडकर सर.






































No comments:

Post a Comment