Sunday, 13 August 2017

भारतीय स्वातंत्र्य दिवस

भारतीय स्वातंत्र्यदिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्याच्या गौरवार्थ हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केले जाते. तसेच देशभरात अनेक ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
भारतात सर्व ठिकाणी स्वातंत्र्य दिनाची सुट्टी दिली जाते. सर्व शाळा ,महाविद्यालये-कार्यालयांमध्ये ध्वजारोहण व ध्वजवंदन असते. राजधानी दिल्ली मध्ये राजपथावर सैन्यदले परेड करतात. त्यादिवशी बहुतांश रेडीओ चैनल तसेच दूरदर्शन वर देशभक्ती विषयी गाणी,कार्यक्रम,चित्रपट लागतात.

No comments:

Post a Comment