Wednesday, 14 November 2018

बालदिन

14 नोव्हेंबर बालदिन अर्थात पंडित नेहरू यांचा जन्मदिन. त्यांना मुले आणि फुले खूप आवडायची. त्यांच्या कोटावर नेहमी गुलाबाचे फुल असे. ते म्हणत कि, मुले हि देवाघरची फुले आहेत. ते आपला मोठेपणा विसरून मुलांबरोबर लहान होत. मुले त्यांना आदराने 'चाचा' असे म्हणत. त्यांचे पूर्ण नाव जवाहरलाल मोतीलाल नेहरू असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल व आईचे नाव स्वरूपराणी होते. त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी झाला. त्यांचं शिक्षण विलायतेत झालं. औक्सफर्ड युनिव्हर्सिटीत त्यांनी बॅरिस्टर पदवी संपादन केली. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री झाले. राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी नेहरूंना 1955 साली भारतरत्न हा सर्वोचंच पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. जय हिंद. वंदे मातरम. बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

1 comment: