साने गुरुजी यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने होते. ते साने गुरुजी या नावाने प्रसिद्ध होते. ते भारतीय स्वातंत्र्य सैनिक, विचारवंत, शिक्षक, लेखक व कवी होते. त्याचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी पालगड, जिल्हा रत्नागिरी येथे झाला व त्याचा मुत्यु 11 जून 1950 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सदाशिव व आईचे नाव यशोदाबाई होते. त्यांच्या वर त्यांच्या आईच्या संस्काराचा खूप मोठा प्रभाव होता. आईच्या संस्कारातून त्यांचे जीवन चरित्र घडत गेले. त्यांची श्यामची आई ही कादंबरी खूप गाजली आहे. त्यांची साधी, सोपी भाषा ही त्यांच्या लेखनशैलीची वैशिष्टये होती. बलसागर भारत होवो ही कविता त्यांनी आपल्या पत्री या काव्य संग्रहातून प्रसिद्ध केल्या. त्यांची खरा तो एकचि धर्म ही प्रार्थना खूप प्रसिद्ध आहे.
अशा या साने गुरुजींना माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद. वंदे मातरम.
अशा या साने गुरुजींना माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद. वंदे मातरम.
No comments:
Post a Comment