मकरसंक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा . तिळगुळ घ्या गोड गोड बोला.
मकर संक्रांत हा सण भोगी, संक्रांत व किंक्रांत असे तीन दिवस साजरा केला जातो. भोगी दिवशी गाजर, पावटा, वांगी, हरभरा, मूग, मटकी, तीळ असे पाच, सात, नऊ भाज्या घालून भोगीची भाजी तयार करतात. तीळ लावून बाजरीची भाकरी तयार करतात. व राळ्याच्या तांदळाचा भात तयार करतात. खणात (ओवसा) ऊस, सोलावणे, भुईमुगाच्या शेंगा, बोरे, हरभरा, ज्वारीचा हुरडा घालून संक्रांती पूजतात. तसेच महिला मंदिरात जाऊन एकमेकांना हळदी कुंकू लावून ओवसतात.
संक्रांती दिवशी सर्वजण एकमेकांना ,मित्रांना, नातेवाईक इत्यादींना तिळगुळ वाटतात. व तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणतात. या सणामुळे ऐकमेकांमध्ये प्रेम, जिव्हाळा याचे दृढीकरण होते.
तिळगुळ हा तीळ व गुळा पासून तयार केला जातो. हा सण हिवाळयात असतो. या दिवसात शरीरातील उष्णता कमी झालेली असते त्यामुळे शरीरातील उष्णता भरून काढण्यासाठी तिळ व गुळाचे मिश्रण देण्याची प्रथा आहे. तसेच या दिवशी पुरण पोळीचा नैवैद्य केला जातो. अशा प्रकारे संक्रांतीचा सण साजरा केला जातो.
धन्यवाद.

No comments:
Post a Comment