छत्रपती शिवाजी महाराज
शिवाजी महाराज यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी झाला. त्यांचे पूर्ण
नाव शिवाजी शहाजी भोसले होते. त्यांना शिवराय, शिवाजी महाराज, शिवबा, राजे, रयतेचा
राजा या नावाने ओळखले जाते. त्यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर पुणे येथे झाला.
त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी तर आईचे नाव जिजाबाई होते. त्यांचा जन्म दिवस शिवजयंती
म्हणून साजरा केला जातो. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना
केली. तसेच अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. शिवाजी महाराज यांची कुशल राजकर्ता म्हणून
त्यांची ख्याती होती. शिवाजी महाराजांच्या जीवनावर चित्रपट, पोवाडे, कविता, नाटके
,पुस्तके लिहिली आहेत. शिवाजी महाराज एक उत्कृष्ट राजकर्ता, लोककल्याणकारी राजा,
आदर्श पुत्र, दूरदृष्टी असणारा योद्धा होते. अशा शिवाजी महाराजांना कोटी कोटी
प्रणाम. शिवाजी महाराज कि जय. वंदे मातरम.
No comments:
Post a Comment