Saturday, 6 April 2019

गुढीपाडवा शुभेच्छा संदेश

सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडवा हा सण संपूर्ण भारतात साजरा करतात. हा सण चैत्र महिन्याच्या व वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो. हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, सोने खरेदी, नवीन उपक्रमांना सुरुवात केली जाते. प्रत्येक घराच्या समोर गुढी उभा केली जाते. गुढी पाडवा हा सण श्रीरामाने रावणावर विजय मिळवला म्हणून विजयाचे प्रतिक म्हणून साजरा केला जातो. तसेच राम चौदा वर्षे वनवास संपवून याच दिवशी आला होता. म्हणून देखील हा सण साजरा केला जातो.
      या दिवशी स्नान करून नवीन वस्त्र परिधान करतात. काठीला नवीन वस्त्र (पीस, साडी ), साखरेची माळ, कडुलिंबाची पाने त्यावर उलटा तांब्या (पितळी किंवा चांदीचा) ठेवून काठी दारासमोर उभी केली जाते. गुढीला  हळदी , कुंकू लावून मनोभावे पूजा केली जाते. शेवया किंवा पुरणपोळीचा नैवैद्य ठेवला जातो. नारळ वाढवून मनोभावे पूजा केली जाते.
      या दिवशी कडुलिंबाची पाने, फुलोरा इ. चा रस गुळात मिसळून देतात. कडुलिंब आरोग्यदायी आहे. अशा प्रकारे गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो.
संकलन व लेखन :- राजू आटपाडकर एम. ए., डी. एड.


3 comments:

  1. नविन वर्षाच्या शुभेच्छा

    ReplyDelete
  2. Thorat sir तुम्हाला पण नविन वर्षाच्या शुभेच्छा

    ReplyDelete