Monday, 1 November 2021

दिवाळी शुभेच्छा संदेश


 दिवाळी :-

दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. यालाच दिपावली असेही म्हणतात. दिवाळीला सर्वत्र दिवे, मेणबत्या लावून तसेच वेगवेगळ्या रंगाच्या लायटिंगच्या माळा लावून रोषणाई केली जाते. हा दिव्यांचा उत्सव आहे म्हणून यालाच दीपोत्सव असेही म्हणतात. या सणाला लहान मुले किल्ले बांधतात. किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या प्रतिकृती ठेवल्या जातात व धान्येही पेरतात. फटाके फोडून तसेच नवीन कपडे घालून हा सण साजरा करतात. एकत्र बसून फराळ करतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात.
दिवस पहिला वसुबारस :-आपला देश हा शेतीप्रधान देश आहे. त्यामुळे या दिवसाला खूप महत्व आहे. या दिवशी गाई व वासराची पूजा करतात व पोळ्याचा नैवैद्य दाखवतात.
दिवस दुसरा धनत्रयोदशी :- या दिवशी धनाची, सोने, पैसे यांची पूजा करतात.
दिवस तिसरा नरकचतुर्थी :- या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला म्हणून हा दिवस नरकासुराचे पुतळे जाळून आनंद साजरा करतात.
दिवस चौथा लक्ष्मीपूजन :- या दिवशी लक्ष्मी पूजन व केरसुनीची पूजा करतात व पूरणपोळीचा नैवेद्य करतात.
दिवस पाचवा पाडवा:- हा साडेतीन मुहूर्ता पैकी एक दिवस आहे. या दिवशी नवीन सोने, घर, गाडी घेतात, तसेच कोणतेही नवीन काम या दिवशी सुरु करतात. पत्नी आपल्या पतीला ओवाळते.
दिवस सहावा भाऊबीज :- या दिवशी बहीण भावाला ओवाळते.
 अशा प्रकारे दिवाळीचा सण सर्वत्र आनंदाने साजरा करतात. ही दिवाळी प्रदूषण मुक्त दिवाळी साजरा करुया.
तुम्हा सर्वाना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हि दिवाळी तुम्हाला आनंदाची व भरभराटीची जावो. धन्यवाद.

3 comments:

  1. दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सर

    ReplyDelete
  2. ⚡️⚡️✨✨Happy Diwali⚡️⚡️✨✨🎁🎁

    ReplyDelete