आज दिनांक पाच सप्टेंबर 2022 आज रोजी जि प शाळा चव्हाण वस्ती नंबर एक येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व मुलांनी शिक्षक व शिक्षिका होऊन विद्यार्थ्यांना अध्यापन केले. उत्साहाने विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. त्याचबरोबर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर आधारित काही विद्यार्थ्यांनी भाषणे केली. यावेळी प्रास्ताविक श्री गोविंद शिवदास तरटे यांनी केले व सूत्रसंचालन मनोगत श्री राजू सुखदेव आटपाडकर यांनी केले.
राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 मध्ये झाला. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती होते. ते भारतीय तत्त्वज्ञ होते त्यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक स्वतः शिक्षक होते त्यांच्या व्यवसाय प्रति असलेली प्रेम व त्यांच्या चाळीस वर्षाचा अध्यापनाचा अनुभव याचा सन्मान म्हणून त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन साजरा केला जातो. त्यांना 1954 मध्ये भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
यावेळी मुख्याध्यापक श्री राजू सुखदेव आटपाडकर, शिक्षक गोविंद शिवदास तरटे, सर्व विद्यार्थी पालक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.






No comments:
Post a Comment