Wednesday, 22 March 2023

मराठी नवीन वर्ष शुभेच्छा संदेश


 गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. येणारे नवीन तुम्हाला सुखाचे, आनंदाचे व समाधानाचे जावो या शुभेच्छा. मराठी वर्षातील गुढीपाडवा हा पहिला सण सर्वत्र आनंदाने व उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी नवीन कामाची सुरुवात केली जाते, नवीन घराचे उद्घाटन, नवीन वस्तू खरेदी, दागिन्यांची खरेदी, जमिनीची खरेदी असे वेगवेगळे कामांचे सुरुवात, या दिवशी केली जाते. हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून या मुहूर्ताला खूप महत्त्व आहे. या दिवशी पुरणपोळी केली जाते. तसेच घरासमोर सूर्योदयानंतर लगेचच गुढी उभा करून हा सण साजरा केला जातो. या दिवशी कडूनिंबाच्या पानाचा रस औषधी म्हणून सेवन केला जातो. गुढीमध्ये नवीन वस्त्र कडुनिंबाची पाने साखरेची माळ व त्यावरती कलश ठेवून ही गुढी पाटावरती उभी केली जाते. हिंदू संस्कृतीत गुढीपाडवा हा महत्त्वाचा सण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी नवीन वस्त्र धारण केले जाते. अशा पद्धतीने हा सण सर्वत्र आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो. या सणाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे अशा प्रकारे या सणाची माहिती सांगता येईल. परत एकदा तुम्हाला गुढीपाडवा या सणाच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

 आपलाच,

राजू सुखदेव आटपाडकर,

जि. प. प्राथमिक शाळा चव्हाणवस्ती नं.१,डफळापूर, तालुका:-जत, जिल्हा:- सांगली. 

1 comment:

  1. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

    ReplyDelete