Happy New year 2024, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2024.
नवीन वर्षाच्या निमित्ताने सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ग्रेगरियन वर्षाप्रमाणे जानेवारी महिन्यात नवीन वर्षाला सुरुवात होते. डिसेंबरच्या 31 च्या रात्री व एक जानेवारीच्या सुरुवातीला विविध कार्यक्रमांचे आयोजन करून नवीन वर्षाचे स्वागत केले व जाते व सरत्या वर्षाला निरोप दिला जातो. यावेळी फटाक्यांची आतषबाजी केली जाते. वेगवेगळे गाणी लावून आनंद साजरा केला जातो. नवीन वर्षाच्या निमित्ताने विविध संकल्प केले जातात. यामध्ये व्यायाम करणे, नवीन पुस्तके वाचणे, प्रवास करणे, प्रेक्षणीय स्थळांना भेटी देणे, नवीन अभ्यासक्रमांना प्रवेश घेणे, असे एक ना अनेक विविध उपक्रम राबवण्याचा संकल्प केला जातो. उत्साहाने दोन-तीन दिवस प्रयत्नही केले जातात. परंतु नंतर यात थोडीशी गती कमी होते. यासाठी जास्तीत जास्त संकल्पना न निवडता कमीत कमी संकल्प निवडावेत व त्याचा सातत्याने पाठपुरावा करावा म्हणजे नवीन वर्षाच्या निमित्ताने आपल्याकडून येणाऱ्या वर्षात चांगले कार्य घडून आपल्या जीवनाचा दर्जा उंचावण्यास मदत होईल. पुन्हा एकदा आपल्या नवीन संकल्पनांना व आपल्या 2024 या नवीन वर्षाच्या निमित्ताने पुन्हा एकदा शुभेच्छा हॅपी न्यू इयर. धन्यवाद.

Happy New year 2024
ReplyDeleteHappy New year
ReplyDeleteThank you
ReplyDelete