वर्धमान महावीर हे जैन धर्माचे २४ वे व शेवटचे तीर्थकर होते. त्यांचा जन्म बिहार मधील कुंडग्राम या वैशाली उपनगरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सिद्धार्थ व आईचे नाव त्रिशला होते. त्यांचे बालपण राजेशाही थाटात गेले. भगवान महावीर यांच्या २८ व्या वर्षी आई वडिलांच्या मृत्यू झाला. त्यांनी गृहत्याग करून बारा वर्षापर्यंत मौन धारण केले व त्यांना ज्ञान प्राप्त झाले. त्यानंतर त्यांनी जनकल्याणासाठी उपदेश देण्यास सुरुवात केली. त्यांनी जैन धर्माच्या अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह इ. बाबीमध्ये ब्रम्ह्चर्याचा समावेश केला. महावीर जयंती हा जैन धर्मियांचा मुख्य सन आहे.
Super
ReplyDeleteThank you
ReplyDeleteखूप छान राजू सर
ReplyDelete