Tuesday, 7 May 2019

अक्षयतृतीया सण शुभेच्छा संदेश

अक्षयतृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणारा सण आहे. हा सण वैशाख महिन्यात शुध्द तृतीयेला साजरा केला जातो. या दिवशी दानाला खूप महत्व आहे. त्यामुळे दान केले जाते व ते दान अक्षय राहते, केलेले दान हे पुण्याचे मानले जाते. पूर्वजांची आठवण (स्मरण) केली  जाते. पाहुण्यांना बोलवून पूजन करून पितर जेवण घातले जाते व पूर्वज आपल्याकडे येवून जेवून गेले असे मानले जाते. या दिवशी नवीन वास्तू प्रवेश, नवीन कामाला सुरुवात केली जाते. कपडे, वाहने, सोने, इ. खरेदी करण्यास हा दिवस शुभ मनाला जातो. तसेच या दिवशी कोणतेही महत्वाचे काम करण्यास मुहूर्त पाहावा लागत नाही कारण हा साडेतीन मुहुतापैकी एक मुहूर्त आहे.
      तुम्हा सर्वाना अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद, सुख, समाधान घेवून योवोत तुमचे धन, सुख, प्रेम, आरोग्य व आपले नाते अक्षय राहो या शुभेच्छा. धन्यवाद.

2 comments: