Sunday, 4 August 2019

नागपंचमी सण

श्रावण महिना हा आनंदाचा व उत्सवाचा महिना आहे. ह्या महिन्यात सर्वत्र हिरवळ, रिमझिम पाऊस  व उत्साही वातावरण असते. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी सर्वत्र वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. या वर्षी नागपंचमी हा सण देखील सोमवारी आला आहे. हा महिना शाकाहारी भोजन करून पाळतात. या महिन्यातील सणांची सुरुवात नागपंचमी या सणाने होते. नाग हा शेतकर्याचा मित्र आहे. तो शेतातील उंदीर खावून शेतीचे रक्षण करतो.  नाग हा महादेवाच्या गळ्यात आहे. तसेच विष्णुदेव हे नागावर विराजमान झाले आहेत. नागपंचमी हा श्रावण महिन्यातील शुध्द पंचमीला येतो. हा सण हिंदू लोक मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात. ह्या सणाला नागाची (देवतेची ) पूजा केली जाते. स्त्रिया वारुळाचे पूजन , नागाचे पूजन करतात. तसेच नागाचे रक्तचन्दन व हळदीने चित्र कडून किंवा प्रतीमेचे पूजन करतात. आदल्या दिवशी नाग चतुर्थी उपवास स्त्रिया आपल्या भावासाठी करतात. विवाहित स्त्रिया नागपंचमीला माहेरी जातात. या वेळी झोपाळा खेळतात. व आपल्या जुन्या मैत्रीणीना भेटतात. हा सण सर्वत्र भक्ती भावाने साजरा केला जातो. नागांना त्रास न देता मोठ्या भक्ती भावाने हा सण साजरा करूया.
       सर्वाना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. 

1 comment: