Friday, 23 August 2019

श्रीकृष्ण जन्माष्टमी /गोपाळकाला शुभेच्छा संदेश

जन्माष्टमी म्हणजे श्रीकृष्ण जन्मदिवस होय. हा सण जन्माष्टमी व गोपालकाला म्हणून साजरा केला जातो. श्रीकृष्ण हा भगवान विष्णूचा आठवा अवतार आहे. भगवान विष्णूचा हा अवतार धर्मरक्षण व दुर्जनांना शासन करण्यासाठी घेतला होता. ज्यावेळी राजा कंस याचा अन्याय व अत्याचार वाढला होता. त्यावेळी त्याची बहीण देवकीच्या पोटी जन्म घेणारे बालक कंस मामाचा वध करणार असे समजल्यामुळे त्याने आपली बहीण व तिचा पती वासुदेव यांना तुरुंगात घातले व त्यांच्या पोटी जन्म घेणाऱ्या बाळाचा वध करी व आपल्या माथी पाप ओढवून घई. अशा वेळी देवकीच्या पोटी  आठव्या  पुत्राचा जन्म श्रीकृष्णाने घेतला व सुखरूप गोकुळात पोचून तेथेच मोठा झाला. त्याला लोणी खूप आवडायचे. गोपाल म्हणजे गाई. तो आपल्या सवंगड्या बरोबर गाई राखत बासरी वाजवत असे. तसेच लोणी खात असे. त्याच्या सुंदर पणामुळे गोपिकांना तो खूप आवडे. कौरव व पांडव यांच्यातील वितुष्ट संपवावे म्हणून मध्यस्ती केली पण श्रीकृष्णाचे काही चालले नाही त्यामुळे त्याला धर्माच्या बाजूने म्हणजेच पांडवांच्या बाजूने जावून दुष्ट कौरवांचा नाश करावा लागला. यावेळी अर्जुनाचा सारथी, मार्गदर्शक होवून श्रीकृष्णाने धर्माचे रक्षण केले.
    जन्माष्टमी दिवशी उपवास केला जातो व तो दुसऱ्या दिवशी सोडला जातो. गोपाळकाला दिवशी दहीहंडी करून ती उंच बांधून मानवी मनोरे करून फोडली जाते.
    आपले बाळ हे श्रीकृष्णा प्रमाणे गोंडस रुबाबदार व्हावे म्हणून घरात श्रीकृष्णाचे फोटो घरात लावला जातो.
    संपूर्ण भारतात मथुरेत, गोकुळात हा सण मोठ्या भक्तिभावाने व श्रद्धेने  साजरा केला जातो.
    सर्वांना जन्माष्टमी व गोपाळकाल्याच्या शुभेच्छा.

1 comment: