Saturday, 5 September 2020

शिक्षक दिन शुभेच्छा संदेश

       आज ५ सप्टेंबर अर्थात शिक्षक दिन, सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे राष्ट्रपती व दुसरे शिक्षण मंत्री होते. ते शिक्षक असून त्यांना शिक्षणाविषयी तळमळ होती.

       ज्या माऊलीने आपल्या जीवनाला आकार दिला व आपले जीवन सुंदर घडवले ती म्हणजे आपली आई आणि योग्य दिशा देवून, मार्गदर्शन करून आपल्या जीवनाचा उद्धार केला ते म्हणजे आपले गुरु शिक्षक.

    आपल्या आयुष्यामध्ये गुरूंना आदराचे व सन्मानाचे स्थान आहे. "गुरुविण कोण दाखवील वाट", असे म्हणाले जाते. ते बरोबर आहे. आज कुशल कारागीर , डॉक्टर, इंजिनिअर, वकील, इत्यादीनी विविध  क्षेत्रामध्ये जी प्रगती केली आहे ती गुरु ( शिक्षक) शिवाय अशक्य आहे. प्रत्येक क्षेत्रात गुरूला आदराचे व महत्त्वाचे स्थान आहे.

   आज शिक्षण दिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. व हा दिवस गुरु विषयी असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे. काही मुले शाळेत अध्यापनाचे कार्य करतात. 

   अशाप्रकारे गुरु विषयी असलेली आत्मीयता व आदर व्यक्त करण्याचा आणि सन्मान करण्याचा हा दिवस आहे.

या दिवशी आदर्श शिक्षकांची निवड करून त्यांना पुरस्कार देवून त्यांचा सन्मान केला जातो. 

पुन्हा एकदा माझ्या सर्व ज्ञात अज्ञात सर्व गुरु शिक्षकांना वंदन करून त्यांना शिक्षक दिवसाच्या शुभेच्छा देतो. 

जय हिंद, वंदे मातरम्.

    

1 comment: