Saturday, 17 October 2020

घटस्थापना शुभेच्छा संदेश

 घटस्थापना :- घटस्थापना अश्विन शुद्ध प्रतिपदा या तिथीला करतात. वारुळाची माती आणून देवार्यावर पत्रावळीत ठेवतात. त्यात ५,७,९ व ११ अशा कडधान्ये, धान्ये यांची पेरणी करतात. घटाला नऊ दिवस नऊ माळा घातल्या जातात. नऊ दिवस पूजाअर्चा केली जाते. म्हणून याला नवरात्री असे देखील म्हणतात. अंबाबाई देवीची तीन वेळेस पूजा केली जाते. सकाळी काकड आरती केली जाते. यावेळी उपवास केला जातो. नऊ दिवस महिला नऊ रंगाचे वस्त्र परिधान करतात. नवरात्र म्हणजे गोंधळ, गरबा नृत्य (दांडिया) व देवीची पूजा केली जाते. नऊ दिवस अखंड दिवा देवीजवळ लावला जातो. या काळात जोगवा महिलांकडून मागितला जातो. यामध्ये धान्ये, तांदूळ असे मागितले जाते. श्रीमंत महिला देखील हा जोगवा मागतात यामुळे घरात घनसंपती वाढते असे मानतात. याला देवीचा प्रसाद देखील मानले जाते. घटस्थापनेचा शेवटचा दिवस हा दसरा असतो. 

   अशा या घटस्थापनेच्या व नवरात्रीच्या आपणा सर्वाना हार्दिक शुभेच्छा.

1 comment:

  1. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छ्या.

    ReplyDelete