दसरा हा सण अश्विन शुध्द दशमीला येतो. घटस्थापनेनंतर दहाव्या दिवशी येत असल्यामुळे या सणाला विजया दशमी असे म्हणतात. दसरा हा सण पराक्रमाचा सण आहे. या दिवशी शस्त्र पूजन, वाहन पूजन केले जाते. हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. या दसर्याच्या मुहूर्तावर नवे घर, नवी वाहने, सोने, नवीन दुकानाचे उद्घाटन तसेच कोणत्याही नवीन कामाची सुरुवात या दिवशी केली जाते.
" दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा.", असे दसरा सणाचे वर्णन केले जाते. तसेच "साधू, संत येती घरा, तोची दिवाळी दसरा", असे संत तुकारामांनी वर्णन केले आहे.
यावेळी नवीन वर्षाचे पहिले पिक घरी येते. त्याचा हा उत्सव साजरा केला जातो. यावेळी घटातील तुरे कानावर, टोपीत किंवा फेट्यात लावतात. या दिवशी पुरण पोळी केली जाते. झेंडूच्या फुलांचे व आंब्याच्या पानांचे तोरण करून ते घराला लावतात. गाडीला, दुकानाला हार घालतात. नारळाच्या झावळ्या दुकानाला लावतात.
विद्येची देवता सरस्वतीचे पूजन करतात. गावाची सीमा ओलांडून गावाच्या बाहेर सायंकाळी सर्वजन एकत्र येतात. आपट्याची पाने ठेवून त्यावर अपरीजीता देवीची स्थापना करून सोने लुटले जाते. व ते एकमेकांना वाटतात त्यावेळी "सोने घ्या, सोन्यासारखे रहा." असे म्हणतात.
अशाप्रकारे आनंदाने व उत्साहाने हा दसर्याचा सण साजरा केला जातो. अशा या दसरा सणाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा.
No comments:
Post a Comment