Thursday, 7 October 2021

घटस्थापना (नवरात्रोत्सव) निमित्त हार्दिक शुभेच्छा

 घटस्थापना म्हणजे काय ?


आपल्या शेतातील माती आणायची व ती एका मातीच्या भांड्या कडेला ठेवायची . त्या मातीच्या भांड्यात आपल्या शेतात असणारे पाणी भरायचे. जेणेकरून तो ओलावा मातीमध्ये टिकून राहिला पाहिजे . जे बियाणे आपल्याला शेतात रब्बी हंगामात पेरायचे आहे त्या बियाणांचे विविध प्रकार असायचे व असतात . अश्या वेगवेगळ्या प्रकारची बियाणे त्या मातीत रूजवायची व नऊ दिवस निरीक्षण करायचे. ज्याची वाढ उत्तम असेल ते बियाणे आपल्या शेतात लावण्यासाठी अत्यंत योग्य आहे हे लक्षात यायचे . पुर्वी बियाणे तपासणी साठी लॅब नव्हत्या मग ही पद्धत त्यासाठी होती. हिंदू धर्मामध्ये नवरात्र उत्सव हा नऊ दिवस चालतो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते व कोणी अखंड नऊ दिवस उपवास करतात तर कोणी कोणी उठता-बसता असेदेखील उपवास करतात देवीने नऊ दिवस युद्ध करून असुरांचा दैत्यांचा संहार केला होता उघडून देवीला महिषासुरमर्दिनी असे देखील म्हटले जाते नवरात्री मध्ये जोगवा मागितला जातो तो जर समजावून मनापासून करतो आपण मागितला तर आपणास मन शांती लाभते अशाप्रकारे नवरात्रोत्सव नऊ दिवस अगदी आनंदाने भक्तिभावाने सर्वजण एकत्र येऊन साजरा करतात आपणास नवरात्रीच्या व घटस्थापनेच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा

3 comments: