Saturday, 2 April 2022

गुढीपाडवा शुभेच्छा संदेश

गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. येणारे नवीन वर्ष तुम्हांला सुखाचे, समाधानाचे आणि भरभराटीचे जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. मराठी वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्याच्या सणाने होते. या दिवशी प्रतिकात्मक रुपाने गुढी उभी केली जाते. यामध्ये यामध्ये एक उंच काठी घेतली जाते. तिला एक तांब्या, मोहर आलेला लिंबाचा ढापा, साखरेचा हार तसेच नवीन वस्त्र साडी किंवा पीस लावले जाते व ही गुढी सकाळी उभी केली जाते. त्याला नारळ वाढवला जातो. हळद कुंकू लावून मनोभावे पूजा केली जाते. या दिवशी लिंबाच्या काड्याचा रस त्यामध्ये गूळ घालून सर्वांना पिण्यासाठी दिला जातो व या दिवशी पोळ्या करून सर्व जण हा सण आनंदाने साजरा करतात. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून गुढीपाडवा हा एक महत्त्वाचा सण आहे या दिवशी सोने खरेदी नवीन गाडी खरेदी घर खरेदी जागा खरेदी दागदागिने यासारख महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी केली जाते हा दिवस शुभ मानला जातो. त्यामुळे नवीन कामाचे सुरुवात देखील या दिवशी केली जाते दुकानाचे उद्घाटन घराचे उद्घाटन एखाद्या नवीन कामाची सुरुवात या दिवशी केली जाते. अशा गुढीपाडवा हा सण सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी काही ठिकाणी यात्रांचे आयोजन देखील केले जाते. धन्यवाद. 
संकलन:- श्री राजू सुखदेव आटपाडकर कवठेमहांकाळ.

3 comments: