आषाढी एकादशी, देवयानी एकादशी ही संपूर्ण वर्षातील महत्त्वाची एकादशी आहे. आषाढी एकादशी निमित्त लाखो भाविक पंढरपूरला पायी दर्शनासाठी जातात. यावेळी विठ्ठल नामाचा जयघोष केला जातो. वारकरी संप्रदायातील हा महत्त्वाचा सण आहे. आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी असे देखील म्हणतात. आषाढ वद्य पक्षातील एकादशीला कामीका एकादशी म्हणतात. अधिक मास असल्यास त्या येणाऱ्या दोन्ही एकादशीला कमला एकादशी असे म्हटले जाते. आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल नामाचा गजर सर्वत्र ऐकण्यास मिळतो. सर्वजण विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढी एकादशी खालील प्रमुख दिंडी यामध्ये सहभागी होतात. त्यामध्ये आळंदीहून ज्ञानेश्वरांची पालखी, देहू हून तुकारामांची पालखी, शेगाव होऊन संत गजानन महाराजांची पालखी, पैठणहून एकनाथांची पालख, एदलाबादेतून मुक्तांची पालखी, त्र्यंबकेश्वर होऊन निवृत्तीनाथांची पालखी या सर्व पालख्या पायी दिंडी करत पंढरपूरला पोहोचतात. आषाढी एकादशी एकादशी दिवशी दिवसभर उपवास केले जातात. यावेळी राजगीर, वरई, बटाटे, रताळे इत्यादी पदार्थांचे सेवन केले जाते. फराळ केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार दक्षिणायन ही देवाची रात्र आहे तर उत्तरायण हा त्यांचा दिवस आहे. आषाढातील कंर्क संक्रांति पासून उत्तरायण संपते तर दक्षिणायन सुरू होते. त्यामुळे या आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात किंवा हरीशयनी एकादशी असे म्हणतात. यानंतर भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला जागे होतात. हा काळ चार महिन्यांचा असतो. आषाढी एकादशी निमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. शाळा, कॉलेज वेगवेगळी विठ्ठल मंदिर या ठिकाणी आषाढी एकादशीनिमित्त दिंडी, फुगडी, भजन यासारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अशा प्रकारे आषाढी एकादशी हा सण मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने पंढरपुरासह संपूर्ण भागात साजरा केला जातो. विठ्ठल विठ्ठल राम कृष्ण हरी.....
संकलन :- श्री राजू सुखदेव आटपाडकर.

🙏🙏🙏💐💐💐
ReplyDelete