Saturday, 12 October 2024

जिल्हा शिक्षक पुरस्कार

 


















दिनांक 11 ऑक्टोंबर 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौगुले, हजारे, दुधाळ मळा अग्रण धुळगाव, तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली, येथील उपशिक्षक श्री. राजू सुखदेव आटपाडकर यांना सन २०२४-२५ चा जिल्हा परिषद सांगली यांच्यातर्फे दिला जाणारा जिल्हा शिक्षक पुरस्काराचे वितरण बालगंधर्व नाट्यमंदिर मिरज येथे करण्यात आले. जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात शाल, श्रीफळ, पीस, ओटी, प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी पालकमंत्री मा. सुरेश भाऊ खाडे साहेब, राज्य प्रकल्प संचालक मा.नंदिनी घाणेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल,चितळे उद्योग समूहाचे प्रमुख विश्वास चितळे,माजी महापौर मैनुद्दीन बागवान, शिक्षणाधिकारी प्राथमिक मोहनराव गायकवाड साहेब , शिक्षणाधिकारी माध्यमिक राजेसाहेब लोंढे साहेब, गटशिक्षणाधिकारी मा.प्रमोद गोफणे साहेब, विविध संघटना प्रतिनिधी, पदाधिकारी, इत्यादी अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment