जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौगुले हजारे दुधाळ मळा, अग्रण धुळगाव येथे दिनांक १४.१०.२०२३ रोजी डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन त्याचबरोबर वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा कराण्यात आला. या वेळी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या फोटोला पुष्पहार वाहून पूजन करण्यात आले. शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. विद्यार्थ्यांचे विविध पुस्तकांचे व वर्तमान पत्रांचे वाचन घेण्यात आले. गायक व वादक शाळेचे मुख्याध्यापक श्री पांडुरंग रामचंद्र जाधव यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. सदर उपक्रम घेऊन वाचन प्रेरणा दिन व वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा केला. यावेळी विद्यार्थी शिक्षक राजू सुखदेव आटपाडकर व मुख्याध्यापक श्री पांडुरंग रामचंद्र जाधव उपस्थित होते.











No comments:
Post a Comment