Friday, 15 August 2025

स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 2025


 स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौगुले हजारे दुधाळ मळा, अग्रण धुळगाव येथे 79 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत, झेंडा गीत व कवायत प्रकार घेण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. उपसरपंच गोरख चौगुले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, उपसरपंच भारती चौगुले, पालक माजी सैनिक, सन्माननीय पदाधिकारी, ग्रामस्थ, नागरिक, अंगणवाडी ताई सुजाता कुंभार देशमुख मॅडम भोसले मॅडम, विद्यार्थी व मुख्याध्यापक राजू आटपाडकर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना पालकांच्या तर्फे खाऊ वाटप करण्यात आले तसेच तानाजी हजारे, ईश्वर हजारे व ऋतुजा हजारे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना जेवणाचा डबा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना पाण्याची बॉटल दिली त्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद व अभिनंदन.

शेवटी मुख्याध्यापक राजू आटपाडकर यांनी उपस्थितांचे आभार मानून व  विद्यार्थ्यांना खाऊ देऊन ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.





















No comments:

Post a Comment