*समकालीन प्रकाशन व युनिक फीचर्स यांचे कडून सौ. मृणालिनी शहा यांच्या तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौगुले हजारे दुधाळ मळा, अग्रण धुळगाव येथे पुस्तकांचे वितरण*
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौगुले हजारे दुधाळ मळा या शाळेत युनिक फीचर्स व समकालीन प्रकाशन यांच्यातर्फे पुस्तक वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात मृणालिनी शहा यांच्या मार्फत शाळेला६०००/- किंमतीची विविध शैक्षणिक व प्रेरणादायी पुस्तके भेट स्वरूपात देण्यात आली.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच त्यांच्या ज्ञानवृद्धीस चालना मिळावी या उद्देशाने ही पुस्तके शाळेसाठी उपयुक्त ठरणार आहेत. कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अजित चौगुले, सदस्य, तसेच नांगोळे केंद्राचे केंद्रप्रमुख संतोष पवार साहेब प्रमुख, विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक राजू सुखदेव आटपाडकर उपस्थित होते.
यावेळी शाळेच्या नाविन्यपूर्ण व उपक्रमशील शैक्षणिक कार्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. या पुस्तकांमुळे शाळेच्या ग्रंथालयात भर पडून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास निश्चितच मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.






No comments:
Post a Comment